आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstrom Hit Nashik Make Huge Loss, Mla Bhujbal Demands Help From Govt

द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे नाशकात आंदोलन, नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/मुंबई- नाशिक व उत्तर महाराष्ट्रात झालेल्या गारपिटीचा मुद्दा उपस्थित करीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी नाशिकमधील आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांनी काल अधिवेशनातही मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने याबाबत कोणतेही निवेदन सरकारकडून दिले गेले नाही. यामुळे सोमवारी अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच स्थगन प्रस्ताव आणून उत्तर महाराष्ट्रातील गारपीटीबाबत मुद्दा उपस्थित करून मदतीची मागणी लावून धरणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नाशिक परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडा येथे आज नुकसान भरपाईची मागणी करीत रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. गारपीटीने निराश झालेल्या शेतक-यांनी रस्त्यावर द्राक्ष फेकून निषेध केला आहे.
भुजबळ यांनी पुन्हा गारपीटग्रस्तांचा मुद्दा उपस्थित करीत द्राक्ष, डाळिंब, कांद्याचे पीक गेल्याचे सांगत मदतीची मागणी केली. तरीही रात्रीपर्यंत सरकारनेही कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांनीही नाशिक, कोकणमधील गारपीट आणि अवकाळी पावसाची माहिती घेऊन निवेदन करू, असे म्हटले आहे. मात्र, कामकाज संपेपर्यंत सरकारने निवेदन केले नाही, त्यावरून सरकार याबाबत गंभीर नसल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. गुरुवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यात गारपीट झाली. एक-दोन फूट गारा पडल्याने प्रचंड नुकसान झाले. पावसामुळे गहू, नवीन कांदा, डाळिंब पिकांचेही नुकसान झाले. सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना भरीव मदत दिली आहे, तशीच मदत नाशिकमधील गारपीट आणि अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱ्यांनाही दिलीच पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
सोमवारी पुन्हा मुद्दा उपस्थित करणार- मी रविवारी येवला आणि अन्य गारपीटग्रस्त तालुक्यांचा दौरा करणार असून, तेथील नुकसानीची माहिती घेणार आहे. सोमवारी विधानसभेत पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करीत मी या शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, नाशिक व परिसरात गारपीटीने शेतक-यांचे कसे नुकसान केले आहे ते...