आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत होणार हज हाऊस; 19 कोटींची खर्च अपेक्षित - नसीम खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठवाड्यातील मुस्लिम बांधवांना हज यात्रेच्या सुविधा मिळण्यासाठी औरंगाबाद शहरात भव्य हज हाऊस उभारण्यात येणार असून त्यासाठी 19 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी शनिवारी दिली.


औरंगाबादेतील शाही मशिदीशेजारी हे भव्य हज हाऊस उभारण्यात येणार आहे. त्यात उर्दू घर आणि वक्फ बोर्डाचे कार्यालय असणार आहे. त्याशेजारील जागेत तंत्रशिक्षण विभागामार्फत वंदे मातरम् सभागृह बांधले जाणार आहे. या दोन्ही इमारती राष्‍ट्रीय एकात्मतेची प्रतीके ठरतील, असेही खान यांनी सांगितले. हाऊससाठी 19 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्याक संस्थांना दर्जा देण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली असून 51 टक्के सदस्य असल्यास संबंधित संस्था याबाबत अर्ज करू शकेल असेही खान यांनी सांगितले.