आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाजी अली दर्ग्यातील मझारपर्यंत महिलांना प्रवेश, SC च्या ऑर्डरनंतर ट्रस्टची संमती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : येथील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यातील मझारपर्यंत महिलांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती दर्गा ट्रस्टने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाने ४ आठवड्यांचा अवधी दिला आहे.

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या न्यायपीठाने ट्रस्टला निर्णयाची अंमलबजावणी करण्यास अवधी दिला आणि मुंबई उच्च न्यायालयाविरुद्धची आव्हान याचिका निकाली काढली. मुंबई उच्च न्यायालयाने याआधी महिलांना मझारपर्यंत प्रवेश देण्याचा आदेश दिला होता.
दर्गा 600 वर्षांपूर्वीचा, प्रवेशबंदी मात्र 5 वर्षांपासून
> हाजी अली दर्गा हा 15 व्‍या शतकातील आहे.
> येथे केवळ मुस्‍लीमच नव्हे तर हिंदू भाविकही मोठ्या संख्‍येने हजेरी लावतात.
> दर्गा संस्‍थानने वर्ष 2011 पासून मजार-ए-शरीफमध्ये महिलांच्‍या प्रवेशावर बंदी घातली होती.
> मुस्लिम महिलांनी या बंदीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
> मुस्लिम समाजातील नेत्यांनी मात्र दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशावर आक्षेप घेतला होता.

नेमकी काय लादली होती बंदी
महिलांना मासिक पाळी येते. या काळात त्‍या अपवित्र होतात. दर्गात आलेल्‍या कोणत्‍या महिला मासिक पाळी आणि कोणत्‍या नाही, हे दर्गा प्रशासन ठरवू शकत नाही. त्‍यामुळे 2011 पासून सरसगट महिलांना प्रवेश बंदी करण्‍यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...