आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Half World : Guideline Declared For The Investigation Of Assault Against Women

सुरक्षा तिची : महिला अत्याचारप्रकरणी तपासणीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अत्याचाराला बळी ठरलेल्या महिलांना यापुढे मानहानिकारक वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागणार नाही. आरोग्य विभागातर्फे तशी मार्गदर्शक तत्त्वे शुक्रवारी जारी करण्यात आली. विशेषत: पीडित महिलांच्या ‘टू फिंगर टेस्ट’ ला मनाई करण्यात आली आहे. तसेच एफआयआर न नोंदवताही वैद्यकीय तपासणी होऊ शकते. एफआयआर नोंदवण्याची नंतरही सक्ती नसेल.


महिला तपासनीस नसल्याचे कारण देऊन रुग्णालये तपासणीस नकार देऊ शकत नाहीत. या परिस्थितीला तातडीची म्हणून मानण्यात यावे व महिलेची तपासणी व्हावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. महिलांवरील वाढते अत्याचार आणि त्यावर उपाययोजना म्हणून तातडीने त्यांची तपासणीची गरज लक्षात घेऊन आरोग्य विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून 100 पानी पुस्तिका संबंधितांना पाठवण्यात आली आहे.


पीडित महिलेला दिलासा मिळावा म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व वैद्यकीय अधिकारी, रुग्णालये, दवाखाने आदींना घालून देण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाच्या एका अधिका-याने सांगितले. हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळले जावे व त्यातून महिलेला कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी यामध्ये घेतली गेल्याचे त्या अधिका-याने स्पष्ट केले.


महिला धोरणासाठी समिती
तिसरे महिला धोरण निश्चित करण्यासाठी महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. समितीत महिला व बालविकास राज्यमंत्री फौजिया खान उपाध्यक्ष असून अन्य सदस्यांमध्ये निलम गो-हे, शोभाताई फडणवीस, माजी आमदार उषा दराडे तसेच क्रांती जेजूरकर, ज्योती म्हापसेकर, फरिदा तांबे, लक्ष्मीनारायण त्रिपाठी आदींचा समावेश आहे.