आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ham bolt Peg win Live In Mumbai? News In Marathi

शीतप्रदेशातील हंबोल्ट पेंग्विन मुंबईत जिवंत राहतील?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात डिसेंबरपर्यंत हंबोल्ट पेंग्विनच्या तीन जोड्या आणल्या जाणार आहेत. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि चिलीतील थंड, निर्जन प्रदेशात आढळणारे हे पेंग्विन्स थायलंडच्या प्राणिसंग्रहालयातून अडीच कोटी रुपयांत खरेदी केले जातील. त्यांना राहण्यासाठी शंभर मीटर परिसरात खास काचेचा कक्ष तयार करण्यात आला असून त्यात थंड पाणी आणि खडक असतील. या कक्षातील तापमान २०-३० अंश सेल्सियस एवढे राखले जाईल, पण एवढी काळजी घेतल्यावरही हे पेंग्विन मुंबईत जिवंत राहू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रयोग आतापर्यंत अपयशीच ठरल्याचे दाखले आहेत.

मुंबई महानगरपालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. उद्धव ठाकरेंनी हंबोल्ट पेंग्विन्स मुंबईत आणण्याची इच्छा व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांनी ती पूर्ण केली. वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातील अडीच कोटी रुपये पेंग्विन खरेदी करण्यासाठी व १९ कोटी रुपये त्यांच्या देखभालीसाठी मंजूर झाले आहेत. वन्यजीव संरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष अनीत अंधेरिया सांगतात, येथे पैशांचा मुद्दा नाही. या िठकाणी अस्वल, मगरीसह इतर प्राण्यांचीच देखभाल होऊ शकत नाही.
हे विदेशी प्राणी टिकू शकले नाहीत
सुमारे २० वर्षांपूर्वी येथे कांगारू आणण्यात आले होते. विषाणू संसर्गाने सर्वांचा मृत्यू झाला.
याच वर्षी जर्मनीहून
>म्हैसूर येथे आणलेल्या चिंपांझीला श्वासाचा आजार होऊन मृत्यू झाला.
>दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याचेही असेच हाल झाले.
>श्रीलंकेतून आणलेला अॅनाकोंडाही विरुद्ध तापमानामुळे जिवंत राहू शकला नाही.
>गेल्या वर्षी एक शिंगी गेंडा आजारी पडल्यामुळे दिल्लीतील प्राणिसंग्रहात पाठवण्यात आला.
>पेंग्विन हा शीतप्रदेशात राहणारा प्राणी आहे. भारतात त्यांना राहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले तरी आतापर्यंतच्या अनुभवावरून सांगते की, हे फक्त २ ते ३ महिनेच इथे जिवंत राहतील. कोणत्याही प्राण्याला कृत्रिम वातावरणात राहण्यास भाग पाडू नये. याचे परिणाम चांगले नसतात.
- मनेका गांधी, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री
(वन्यजीव हक्कासाठी त्या नेहमी पुढाकार घेतात)