आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Handicapped People Once Again Agitation At Mumbai Mantralaya

मंत्र्यांच्या बंगल्यासमोर अपंगांनी रात्रभर आंदोलन केल्यानंतर सरकारला आली जाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील तमाम अपंग बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली दोन दिवसापासून आंदोलन सुरु आहे. मात्र नेहमीप्रमाणे सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चिडलेल्या अपंग बांधवानी काल रात्री आपला मोर्चा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सरकारी मुक्तागिरी बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. सर्व अपंग आंदोलकांनी संपूर्ण रात्रच या बंगल्याबाहेर घालवली. त्यानंतरही दुर्लक्ष केलेल्या सरकारला कडू यांनी इशारा दिल्यानंतर सरकारला अखेर जाग आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बच्चू कडूंसह अपंग संघटनेच्या प्रमुख सहा-सात कार्यकर्त्यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात आज चर्चेला बोलावले आहे. त्यामुळे कडू यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेची लोक चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या मागण्या रेटणार आहेत.
दोन महिन्यांपूर्वीही कडू यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील मंत्रालयावर अपंग संघटनेने मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर काहीही हालचाली झाल्या नसल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार या अपंगानी उचलले आहे. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही आंदोलन थांबविणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, अपंगांना पोलिस हटविण्याच्या तयारीत आहेत.
अपंग आंदोलकांनी पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत.
- सरकारी नोकरीत असलेले तीन टक्के आरक्षणानुसार अनुशेष भरून काढावा.
- दोन अपंग व्यक्तींनी विवाह केल्यास त्यांना सरकारने अनुदान द्यावे.
- अपंगांना सध्या प्रति महिना 600 रूपये मिळतात त्याऐवजी 4000 रूपये द्यावेत.
- अपंगांच्या कल्याणासाठी सरकारने स्वतंत्र अपंग कल्याण विभाग स्थापन करावा.
- प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अपंग भवन आणि वसतीगृह सुरु करावे.