आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोपीनाथ' का ठेवलं माझं नाव? बालपणी विचारायचे मुंडे साहेब, पाहा 25 दुर्मिळ फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/बीड- हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात रमणारा नेता, लोकनायक अशी ओळख मिळवलेले भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात उच्‍चपदापर्यंत पोहोचणा-या गोपीनाथरावांचा जीवनसंघर्ष अत्‍यंत खडतर व प्रेरणादायी आहे.

एका छोट्या गावातून केंद्रिय मंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप कष्टदायी राहिला. परळी गावातील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा 12 डिसेंबर 1949 रोजी जन्म झाला होता. चला तर मग पाहूया.... गोपीनाथ मुंडे यांचे अत्‍यंत दुर्मिळ फोटोज आणि जाणून घेऊया त्यांंच्या आयुष्याातील काही खास प्रसंग..

नाव आवडत नव्‍हतं म्‍हणून रडायचे गोपीनाथराव
गोपीनाथ मुंडे यांच्‍या मातोश्री लिंबाबाई मुंडे यांनी गोपीनाथरावांच्‍या बालपणाच्या काही खास गोष्‍टींचा खुलासा केला होता, गोपीनाथ मुंडे बालपणी खूप खोडकर आणि हट्टी होते. ‘माझं नाव ‘गोपीनाथ’ का? मला आवडत नाही,’ असे म्‍हणून गोपीनाथराव लहानपणी तासन्‍तास रडायचे. वडिलांनी मात्र त्यांचे खूप लाड केले. अशा अनेक आठवणी लिंबाबाई यांनी सांगितल्‍या होत्‍या.

‘बघा, आय झोपलीय, गाय रस पिऊन गेली.’
एका आठवणीत लिंबाबाई म्‍हणतात, एकदा मी दुपारी स्वयंपाक आटोपून झोपले होते. आमरस करून माठाखाली ठेवला. स्वयंपाकघराच्या बाहेरून कडी घातली. 5-6 वर्षांचा गोपीनाथ आला. मी झोपू नये असे त्याला वाटे. मला झोपलेली पाहून रागावला. गोठ्यातून गाय आणली, कडी उघडली. आमरस गाईला दिला आणि पळत जाऊन ‘दादांना’ आणलं. ‘बघा, आय झोपलीय, गाय रस पिऊन गेली.’ मी घाबरून उठले. म्हणाले, ‘गाय रस पिते आहे, पण लबाडा, गाय कवाड काढून कशी आली रे? आणि माठाखालचा रस हाताने घेतला कारे तिनं?’

पुढील स्‍लाइड्सवर पाहा दुर्मिळ फोटोंसह काही खास आठवणी..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...