आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजात जुळले प्रेम; वाचा, गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञाताईंच्या आंतरजातीय विवाहाची झाली होती चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/मुंबई- गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या भाजपचे दोन्ही दिवंगत नेत्यांच्या झंझावाती प्रचाराने एकेकाळी अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. आधी जनसंघ आणि पुढे भारतीय जनता पक्षाचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या गावागावात घट्ट रुजविली होती. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र त्‍यांनी अक्षरश: पिंजून काढला होता. कालांतराने दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीचे बंध घट्ट होत गेले अन् या मैत्रीचे रुपांतर नात्‍यात झाले.

प्रमोद महाजन यांच्‍या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्‍याशी गोपीनाथ मुंडे यांचा विवाह झाला. आज, 12 डिसेंबर. गोपीनाथ मुंडे यांचा जन्‍मदिवस. यानिमित्‍ताने या संग्रहात जाणून घेऊया मुंडे यांच्‍या प्रेमविवाहाविषयी रंजक माहिती...

गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञाताईंची पहिली भेट कॉलेजात झाली. राजकारणातून झालेली मैत्री, मैत्रीतून फुललेले प्रेम लग्‍नापर्यंत पोहोचले. दोघांनी लग्‍नाचा निर्णय घेतला. त्‍याला काही प्रमाणात विरोधही झाला. मात्र, आंबेजोगाईमध्‍ये 21 मे 1978 या दिवशी हा लग्‍नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

आंतरजातीय प्रेमविवाहाची सर्वत्र चर्चा...
गोपीनाथराव आणि प्रज्ञाताई यांचा प्रेमविवाह हा आंतरजातीय होता. विवाहाला काहीसा विरोधही झाला होता. पण, ही जोडी कोणाचाही पर्वा न करता विवाहबद्ध झाली होती. या विवाहाची तेव्हा राज्‍यभर चर्चा झाली होती.

पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून दुर्मिळ फोटोंसह वाचा, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमविवाहाशी संबंधित काही रंजक किस्से...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...