आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ENGINEER\'S DAY SPL: कळसुबाई शिखरावर शुभमंगल, एका मेकॅनिकलच्या अनोख्या लग्नाची गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/अहमदनगर- रविवार, 28 डिसेंबर 2014, 'शुभ मांगल्या'च्या पाऊलवाटेवरील एका अनोख्या मंगलकार्याने हा दिवस स्मरणीय झाला. अर्थात अर्थाअर्थी संबंध नसला तरी शुभकार्याचा एक धागा मात्र जुळलेला. मेकॅनिकल इं‍जिनिअर विवेक पाटील आणि स्वप्नाली धाबुगडे या जोडीने अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई शिखरावर लग्नाचा गड फत्ते केला.

आज (15 सप्टेंबर) जागतिक अभियंता दिन अर्थान इंजिनिअर्स डे. या निमित्त आम्ही आपल्यासाठी मेकॅनिकल इं‍जिनिअर विवेक पाटील आणि स्वप्नाली धाबुगडे यांच्या अनोख्या लग्नाची गोष्‍ट घेऊन आलो आहे.

कळसुबाई: लग्नाचे शिखर
महाराष्ट्रातील सर्वोच्च (1646 मीटर) कळसुबाई शिखरावर विवेक पाटील आणि स्वप्नाली धाबुगडे ही ट्रेकिंगवेडी जोडी विवाहबद्ध झाली. येथेच त्यांची पहिली भेट झाली होती. जिथे एकत्र आलो, त्या निसर्गाच्या साक्षीनेच नव्या नात्याची सुरुवात करावी, असा निर्णय विवेक आणि स्वप्नालीने घेतला आणि आयुष्यातील महत्त्वाचे शिखर सर करण्यासाठी कळसुबाई शिखर गाठले. कळसुबाई शिखरावर झालेला हा पहिलाच विवाहसोहळा.

सामाजिक भान: साखरपुडा वृद्धाश्रमात झाला. आदिवासींना रोजगार मिळावा, ही सामाजिक भावना कळसुबाईवरील लग्नामागे होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... एका इंजिनिअरच्या अनोख्या लग्नाची गोष्ट!
बातम्या आणखी आहेत...