आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गे\' मुलासाठी आईने दिली होती जाहिरात, हरीश अय्यरला मिळाला \'नवरदेव\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- हरीश अय्यरसोबत एका कार्यक्रमात अभिनेत्री श्रीदेवी... - Divya Marathi
फाईल फोटो- हरीश अय्यरसोबत एका कार्यक्रमात अभिनेत्री श्रीदेवी...
मुंबई- समलैंगिक मुलगा हरीश अय्यर याच्या लग्नासाठी वृत्तपत्रात जाहिरात देणा-या पद्मा अय्यर यांना लवकरच मुलासाठी नवरदेव मिळणार आहे. वृत्तपत्रात जाहिरात दिल्यानंतर 36 वर्षीय हरीशला लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत. ज्यातून परिवार एक अय्यर आडनावाच्या मुलालाच नवरदेव बनविण्याचा विचार करीत आहेत. मागील महिन्यात 58 वर्षीय पद्मा अय्यर यांनी मुंबईतील वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती. ज्यात त्यांनी म्हटले होते की, त्या आपल्या गे मुलाच्या लग्नासाठी नवरदेवाचा शोध घेत आहेत. आपल्याला माहित असेलच की, हरीश अय्यर मुंबईतील एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रान्सझेंडर) कम्युनिटीतील जाने-पहचाने नाव आहे.
काय म्हटले होते जाहिरातीत-
पद्मा यांनी वृत्तपत्रात जी जाहिरात दिली होती त्यात लिहले होते की, ''Seeking, 25-40, well-placed, animal-loving, vegetarian groom for my son (36, 5'11), who works with an NGO...caste no bar but Iyer preferred''' या जाहिरातीनंतर हरीशसोबत लग्न करण्यासाठी अनेक प्रस्ताव आले होते. त्यातील दोन अय्यर, दो मुस्लिम आणि अन्य काही मुलांचे प्रस्ताव मिळाले होते त्यातून ते आता नवरदेव निवडणार आहेत.
जाहिरातीनंतर आलेला पहिलाच प्रस्ताव हरीशने स्वीकारला- परिवाराची घेतली भेट
मागील रविवारी हरीशने एका अय्यर मुलाला (ज्याने जाहिरातीनंतर सर्वप्रथम प्रतिसाद दिला होता) आपल्या घरी आणले होते. तेथे त्याने पिता विश्वनाथ अय्यर आणि आई पद्मा यांनी या भावी जोडीदाराचे स्वागत केले. तमिळ मुलगा अय्यर जो एमएस्सी आहे व तो मुंबईत स्टॅटिशियन (सांख्यिकीतज्ज्ञ) आहे. अय्यर फॅमलीला हा मुलगा पसंत पडलेला आहे.
चेन्नईजवळील एका गावात राहणा-या या भावी जोडीदाराला हरीशच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वेळी विचारले जाणारे काही 'पारंपरिक प्रश्नही' विचारले. हरीशच्या आजीने या भावी नवरदेवाला 'कर्नेटिक साँग' गायला सांगितले. त्या मुलानेही कर्नेटिक पारंपरिक गीत- गजावेदना सहज गाऊन दाखवले. हरीश म्हणाला, माझ्या आईने, वडिलांनी, आजीने व माझ्या प्रिय मांजरानेही त्याला पसंती दिली आहे. माझ्या वडिलांनी अनेक प्रश्न विचारले ज्यात रात्री बाहेर राहण्याबाबतचा होता. सुमारे दोन तास कौटुंबिक चर्चा झाली. यावेळी सर्वांनी डोसाही खाल्ला.
आईला मुलगा पसंत मात्र 'सेक्सुअली कम्पेटिबल'ची भीती-
हरीशच्या आईने सांगितले की, मी त्या अय्यर मुलाला भेटले. तो खूपच विश्वासू वाटला. तो सौम्य, शांत व हळूवार बोलणारा आहे. मला वाटते तो हरीशची काळजी घेईल. हरीश म्हणाला, घरी भेटल्यानंतर माझ्या आईने मला सल्ला दिला की, तू निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ घे. तुम्ही दोघे एकमेंकाना चांगले समजू लागल्यानंतर पुढचा निर्णय घ्या. माझी आईला काळजी वाटते की, तो माझ्यासाठी 'सेक्सुअली कम्पेटिबल' असेल की नाही.
हरीश नवरदेवाला प्रथम मंदिरात भेटला-
कुटुंबियांना भेटण्याआधी आईच्या सांगण्यावरून हरीश त्या मुलाला नेरुळमधील एसआयआएस कॉलेज परिसरातील कामाक्षी मंदिरात घेऊन गेला. तेथे त्यांनी भेट घेतली. हरीश म्हणाला, मी मंदिरात आणि चर्चमध्ये नेहमी जातो. मी कधी विचार केला नव्हता की आम्ही सर्वप्रथम मंदिरात भेटू किंवा डेटिंग करू. मंदिरातील भेटीनंतर त्यांनी कॉलेजसमोरील हॉटेल रंगोलीत प्रदीर्घ चर्चा केली. हरीश म्हणाला, या भेटीदरम्यान आम्ही आपल्या आयुष्याबाबत चर्चा केली. मी त्याला जीवनात मिळणा-या अटेंशन, क्रिटिसिज्म आणि जजमेंट याबाबत माहिती दिली ज्याचा पुढे सामना करावा लागणार आहे.
काय हे कायदेशीर आहे?
कलम 377 च्या नुसार, अनैसर्गिक सेक्य देशात बेकायदेशीर आहे. मात्र, कायद्यात सेम सेक्स मॅरेजबाबत काहीच म्हटले नाही. सेम सेक्स मॅरेजला कायदेशीर मान्यता मिळाली नाही. मात्र असे केले तर कायदेशीरदृष्या तो दोषी ठरतो व शिक्षेला पात्र ठरतो.
पुढे स्लाईडसद्वारे पाहा, समलैंगिक मुलाच्या लग्नासाठी आईने दिलेली जाहिरात...
बातम्या आणखी आहेत...