आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्‍या बहिणीचीही होती दशहत, डॉनच्या पलायनानंतर सांभाळली सूत्रे !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भारतातून पळून गेल्‍यानंतर त्‍याची मोठी बहीण हसीना पारकर ही त्‍याचा सर्व व्‍यवहार पाहत असे. जुलै 2014 मध्‍ये तिचे हृदय विकारच्‍या झटक्‍याने निधन झाले. दाऊदएवढीच त्‍याच्‍या बहिणीची दहशत होती. अंडरवर्ल्‍डमध्‍ये तिला सर्व घाबरत असत. दाऊदच्‍या संपत्‍तीचा आज (बुधवार) लिलाव होणार आहे. 1 कोटी 18 लाखांपासून बोली सुरू होणार आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे डॉनच्‍या बहिणीविषयी माहिती....

रिअल इस्टेट क्षेत्रातलं एक बडं नाव असलेल्या विनोद अलवानींनी 2007 साली 30 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका महिलेविरोधात मुंबई पोलिसात तक्रार केली आणि ती बर्‍याच वर्षांनंतर पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली... ही तक्रार होती कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मोठी बहीण हसीना पारकर ऊर्फ हसीना आपा हिच्याविरोधात.. अंडरवर्ल्डमध्ये तिचा दबदबा होताच, पोलिसांचेही तिच्यावर लक्ष होतेच, पण खंडणीच्या तक्रारीनंतर ती सर्वसामान्यांनाही माहीत झाली. वडाळ्याच्या एका झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या वादातून अलवानींनी हसीना विरोधात ही तक्रार केली होती.
गोष्ट तशी फार जुनी नाही अगदी आठ दहा वर्षापूर्वीची...नागपाडा पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिमतीमकर मार्गावरच्या गॉर्डन हाऊस या चिरेबंदी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हसीना आपाचा दरबार चाले... दाऊद इब्राहीम या नावाच्या दहशतीमुळे मुंबईच्या गुन्हेगारी जगतात आपाचा शब्द प्रमाण मानला जाई. विशेषत: बांधकाम व्यवसायातले तंटे तिच्या एका शब्दावर सुटत.
जमिनीचे वादांचे सेटलमेंट
ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर कधीतरी दाऊद देशाबाहेर पळाला तेव्हा मुंबईत बांधकाम व्यवसाय जोर धरत होता. बड्या बिल्डर्सकडचा बेफाम पैसा 'प्रोटेक्शन मनी'च्या नावाखाली गँगस्टर्सकडे जात होता. या बिल्डर्सना इतर टोळ्यांपासून संरक्षण देता देता अनेक गुंड स्वत:च बिल्डर्स झाले. झोपड्या आणि चाळींचा पुनर्विकास करण्यावर या नवख्या बिल्डर्सनी लक्ष केंद्रीत केले. अशा बिल्डर्सना झोपडीधारकांची आणि चाळकर्‍यांची संमती मिळवून देण्यात हसीनाचा हातखंडा होता. पुढे या बिल्डर्समधले तंटे सोडवण्याचे कामही दाऊदच्या हवाल्याने ती करू लागली.
‘हवाला’वरही वर्चस्व
1991 साली अरूण गवळी टोळीने हसीनाचा नवरा इस्माईल पारकर याची हत्या केली. या घटनेनंतर काळया धंद्याची सगळीच सुत्रं हसीनाने आपल्या हाती घेतली. यानंतरच खर्‍या अर्थाने तिचा गुन्हेगारी विश्वात सक्रिय सहभाग वाढला. दाऊदच्या नावे हिंदी सिनेमाचे परदेशातल्या विशेषत: रशिया आणि आखातातल्या प्रदर्शनाचे हक्क विकत घेण्याचेही काम ती करत असे. भारतातून मध्य-पूर्व आशियात हवालाच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करणे हा सुद्धा तिच्या अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय होता.
केबलमध्येही गुन्हेगारीचे जाळे
मुंबईतल्या केबल व्यावयायिकांमधली भांडणे सोडवणे हा आपाचा आणखी एक उद्योग.. असेही सांगितले जाते की सध्या मुंबईतल्या विविध केबल नेटवर्कच्या ज्या हद्दी आहेत त्या हसीनानेच आखून दिल्या आहेत. हसीनाला दोन मुले आणि दोन मुली. थोरला मुलगा दानिश याचा 2006 साली कार अपघातात मृत्यू झाला होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हसीना कशी झाली अंडरवर्ल्‍डमध्‍ये सक्रिय... आता कोण सांभळतो दाऊदचा भारतातील व्‍यवसाय