आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेः 14 जणांचे गळे चिरणारा नराधम हसनैन मतिमंद बहिणीवर करायचा पाशवी बलात्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ठाण्यात २८ फेब्रुवारी रोजीच्या १४ जणांच्या हत्याकांडात पोलिसांनी शनिवारी नवा खुलासा केला आहे. या हत्याकांडाबाबत माहिती देण्यासाठी ठाणे सहआयुक्त आशुतोष डुंबरे शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, हसनैन हा त्याची लहान मतिमंद बहीण बतुल हिच्यावर अत्याचार करत होता. ही गोष्ट कुटुंबीयांना समजली होती. त्यामुळे समाजात आपली बदनामी होऊ नये यासाठीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे एकमेव वाचलेली बहीण सुबियाने म्हटले आहे. हत्याकांडाच्या दिवशी दावतमधील जेवणात काहीतरी मिसळलेले होते, असेही सुबियाने सांगितल्याचे डुंबरे म्हणाले.

अन्वर वारेकर यांच्या चार मुलींपैकी अविवाहित असलेली बतुल मतिमंद होती. याचा गैरफायदा घेत हसनैन तिच्यावर अत्याचार करत असे. तसेच कर्जाचा डोंगरही यासाठी कारणीभूत आहे. हसनैनने व्यवसायासाठी आजोबा, आई, मावशीकडून ६७ लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी तो मावश्यांना व्याजही देत होता. ते न पेलवल्यानेच तो वैफल्यग्रस्त झाला होता, असेही सुबिया हिने आपल्या जबानीत सांगितल्याचे डुंबरे म्हणाले.
पुढील पाच स्‍लाइड्सवर पाहा, कशी केली हसनैनने 14 जणांची हत्‍या....