आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत सतर्कतेचा इशारा; समुद्रात उसळल्या उंच लाटा, शाळांना सुटी जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह संपूर्ण राज्यात आज (बुधवार) सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. बृहन मुंबई महापालिकेने (बीएमसी) नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर शाळेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनाही घरी सोडण्यात आले आहे. संततधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील जणजीवन ठप्प झाले आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास समुद्र किनार्‍यावर 4.95 मीटर ऊंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरील परिसरात पाणी शिरले आहे. येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईसह उपनगरात मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रेल्वे, रस्ते वाहतूक खोळंबल्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

ठाण्यातील वाहतूक कोंडीतून वाट काढताना एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तीन हात नाका परिसरात ही घटना घडली. ईश्वरचंद मौर्या असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गरज असली तरी तर घराबाहेर पडा, असे महापालिकेने जनतेला केले आहे.

ठाण्याच्या आनंदनगर जकात नाक्याजवळ ट्रॅफिक जॅम झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे तर मुंब्रा बायपासवर रस्ता खचल्याने वाहतूक ऐरोलीमार्गे मुंबईकडे वळवण्‍यात आली आहे.

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल हवामानस्थितीमुळे सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार आषाढसरींनी हजेरी लावली. कोकण, विदर्भ आणि सह्याद्री डोंगररांगेतील अनेक गावे अतिवृष्टीने जलमय झाली आहेत, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुलनेने पावसाचा जोर कमी होता. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी दादर, हिंद माता, परळ, एलफिन्‍स्‍टन पुल इत्‍यादी ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवाही धीम्‍या गतीने सुरु आहे. तिन्‍ही मार्गावरील लोकल्‍स सुमारे 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. आज मुंबईत मोठी भरती येणार असून 4.95 मीटर उंचीच्‍या लाटा उसळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.