Home | Maharashtra | Mumbai | Havey Rain in over Maharashtra

मुंबईत हायटाईड; हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प, चुनाभट्टी- कुर्ल्यादरम्यान साचले पाणी

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 23, 2013, 03:21 PM IST

4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या असून समुद्राचे पाणी शहरात शिरले आहे.

 • Havey Rain in over Maharashtra

  मुंबई- ऐन पावसाळ्यात मुंबईतील समुद्रात आज (मंगळवार) भरती आली आहे. 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या असून समुद्राचे पाणी शहरात शिरले आहे. तसेच दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने हार्बर लाईनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चुनाभट्टी- कुर्ल्यादरम्यान पाणी साचल्याने पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यानची वाहतूक बंद करण्‍यात आली आहे. दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीच्या कोंडीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.

  मुंबईत दुपारी बारानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. काही भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. खोल समुद्रात न जाण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.

  मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूरसह संपूर्ण राज्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

  दुसरीकडे कोकणातील निवसरजवळ रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅक खचल्याने या मार्गावर धावणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

  मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असून मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. नवी मुंबई, ठाणे, कांजूरमार्ग, ठाणे, पवई परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड परिसरात पावसाची रिमझीम सूरू आहे. मुंबईच्या 'लाईफलाईन' समजली जाणारी तिन्ही मार्गाच्या लोकल गाड्या संथ गतीने धावत आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
  (छायाचित्र -संग्रहीत)

 • Havey Rain in over Maharashtra
 • Havey Rain in over Maharashtra

  मुंबईसह उपनगरात मुसळधार...
  नवी मुंबई, ठाणे, कांजूरमार्ग, ठाणे, पवई परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड परिसरात पावसाची रिमझीम सूरू आहे. मुंबईच्या 'लाईफलाईन' समजली जाणार्‍या लोकल सेवेवर अद्याप या पावसाचा परिणाम झालेला दिसत नाही.

 • Havey Rain in over Maharashtra

  कोकणात अत‍िवृष्टीचा इशारा...
  रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या 24  तासांत अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
   
  चिपळूणमधील वाशिष्टी, खेडमधील जगबुडी आणि राजापुरातील अर्जुना नदी तर संगमेश्वरमधील शास्त्री नदीला पूर आला आहे. या नद्यांशेजारील गावांना सर्तकतेचाही इशारा देण्यात आला आहे.

Trending