आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hc Acquits 5 In Best Bakery Case, Upholds Life Term To 4

बेस्ट बेकरी प्रकरण : चार जणांची जन्मठेप कायम, पाच निर्दोष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बडोद्यातील बेस्ट बेकरी प्रकरणातील पाच आरोपींना ठोस पुरावा नसल्यामुळे मुंबई हायकोर्टाने निर्दोष घोषित केले असून, चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
न्या. व्ही. एम. कानडे आणि पी. डी. कोडे यांनी आज संजय ठक्कर, बहादूर सिंग चौहान, सनाभाई बारिया, आणि दिनेश रायभर यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. बेस्ट बेकरीतील चार कामगारांनी दिलेल्या साक्षीवरून हाय कोर्टाने या चौघांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अपील करणा-या बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणातील 9 आरोपींच्या अर्जावरील निकाल उच्च न्यायालयाने मंगळवारी(३ जुलै) रोजी राखून ठेवला होता.
कनिष्ठ न्यायालयाने सहा वर्षांपूर्वी या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गोध्रा दंगलींनंतर उसळलेल्या हिंसाचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी 14 जणांनी गुजरातमधील बडोदा शहरातील हनुमान टेकडी येथील बेस्ट बेकरीत आश्रय घेतला होता. सुमारे 20 जणांच्या जमावाने त्यांना जिवंत जाळले. या प्रकरणातील 17 आरोपींपैकी नऊ जणांविरोधातील गुन्हा सिद्ध झाल्याने विशेष न्यायालयाने 2006मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला या आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायाच्या प्रतीक्षेत...दहा वर्षे !