आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी यात्रेच्या गर्दीवर काय उपाययाेजना केली : हायकाेर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आषाढी एकादशी सोहळ्याला श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये होणारी वारकऱ्यांची गर्दी पाहता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कोणती उपाययोजना केली आहे, याबाबतचा तज्ज्ञ समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाने सादर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. सरकारने त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. याबाबत आता २४ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मानवी मैला वाहतुकीविरोधात लढणाऱ्या संघटना तसेच काही सामाजिक संघटनांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि एस. बी. शुकरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायमूर्तींनी हे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...