आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC Quashes Divorce Decree On Ground That Wife Should Be Heard

ऑस्ट्रेलियन पत्नीसोबतचा घटस्फोट रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑस्ट्रेलियन पत्नीने 1991 मध्ये सोडून दिल्याचा दावा करणार्‍या व्यक्तीचा आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेला घटस्फोट उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या प्रकरणात पत्नीचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणात आपले म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा दावा पत्नीने केला आहे. घटस्फोटामुळे पती-पत्नीच्या भावी आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे पत्नीला तिचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, असे न्या. नरेश पाटील व न्या. ए. आर. जोशी यांनी म्हटले आहे. पत्नीची घटस्फोटाला आव्हान देणारी याचिका 2005 पासून प्रलंबित आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज सहा महिन्यांत निकाली काढावा. पती-पत्नीने मार्चच्या पहिल्या आठवड्यात कौटुंबिक न्यायालयात हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पत्नी सलग दोन तारखांना गैरहजर राहिल्यास कौटुंबिक न्यायालयाने कायद्यानुसार निर्णय घ्यावा. पत्नीला न्यायालयीन प्रक्रियेत सामावून घेण्याचा आमचा उद्देश आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण - 12 मार्च 1988 रोजी टास्मानियातील ऑस्ट्रेलियन मरीन टाइम कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय व्यक्तीची एका महिलेशी ओळख झाली. त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. त्याआधी तिने पहिल्या पतीला घटस्फोट देण्याचे कबूल केले होते. 20 ऑक्टोबर 1988 रोजी तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला व संबंधित व्यक्तीसोबत लग्न केले. आपली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे मूल देऊ शकत नसल्याचे तिने पतीला सांगितले. तिने फसवणूक केल्याची भावना पतीची झाली आणि त्यांनी मूल दत्तक घेण्याचे ठरवले. यादरम्यान त्यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, पत्नीने त्यानंतर दोन वर्षे त्याच्याशी संबंध ठेवले नाहीत. याच कारणावरून पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.