आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC Quashes GR Which Says Married Daughter Not Part Of 'family'

विवाहानंतरही मुलगी माहेरच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग - मुंबई हायकोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विवाहानंतरही मुलगी ही माहेरच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असल्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या एका GR च्या आधारे महिलेला रॉकेल वाटपाचा परवाना देण्यास नकार देण्यात आला होता. यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

जस्टीस अभय ओका आणि ए.एस.चांदुरकर यांच्या पीठाने निर्णय दिला. रंजना आनेराव या महिलेने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. रंजना यांच्या आईंकडे रॉकेल विक्रीचा परवाना होता. त्यांच्या मृत्यूनंतर रंजना यांनी आपणही कुटुंबाचा एक भाग असल्याने, आईनंतर तो परवाना आपल्याला मिळावा अशी मागणी केली होती. पण त्यांच्या भावाने रंजना या विवाहीत असल्याने त्या कुटुंबाचा भाग नसल्याचे सांगत या परवान्यावर दावा केला होता. तसेच राज्य सरकारच्या परिपत्रकामध्येही अशी नोंद आहे.
त्यावर रंजना यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीने काही दाखले न्यायालयात सादर करण्यात आले. त्यांनी 26 फेब्रुवारी 2013 च्या एका GR चा दाखला दिला. त्यानुसार अनुकंपा तत्वावर विवाहीत मुलीला नोकरी देणे शक्य असल्याची नोंद होती. तर 19 मे 2014 च्या एका GR मध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या विवाहीत मुलीला स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलांना मिळणा-या सवलतीसाठी ग्राह्य ठरवण्यात आले होते.

त्यावर जर अशा प्रकरणांमध्ये विवाहीत मुलीला काही अधिकार प्रदान करण्यात येत असतील तर या प्रकरणात मुलीला कुटंबातील सदस्य का ठरवले जाऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने हा निर्वाळा केला.