आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित डॉक्टरांना तातडीने कामावर घ्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या महिन्यात संपावर गेलेल्य 600 आयुर्वेदिक डॉक्टरांना निलंबित करणारा राज्य सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल ठरवला. या डॉक्टरांना तातडीने सेवेत रुजू करून घ्यावे, असे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांनी 1 ते 7 जुलैदरम्यान संप केला होता. त्याला आयुर्वेदिक डॉक्टरांनीही पाठिंबा दिला होता. या संपाच्या काळात सुमारे 230 जणांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे शपथपत्र आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी न्यायालयात सादर केले आहे. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

दरम्यान, सरकारच्या निलंबनाच्या आदेशाला 98 आयुर्वेदिक डॉक्टरांनी आव्हान दिले होते. गुरुवारी न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारची ही कारवाई अतिशय कठोर असल्याचे नमूद करत न्यायमूर्तींनी या डॉक्टरांना तातडीने सेवेत रुजू करून घ्यावे, तसेच संपाच्या काळातील वेतन व भत्तेही द्यावेत, असेही बजावले. डॉक्टरांनीही तातडीने रुजू व्हावे, असे निर्देश दिले.