आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • He Bombay High Court Has Ruled That Only Blood Relations Can Claim To Be

आई-वडीलही विवाहित मुलीचे वारसदार - हायकोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आई-वडिलांनाही विवाहित मुलीचे वारसदार बनवले जाऊ शकते, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 13 वर्षांपूर्वी एका 19 वर्षीय विवाहितेचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता.या दाव्यावरील सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने हा निकाल दिला.
मोटारवाहन कायद्याप्रमाणे मृताच्या कुणाही कायदेशीर वारसदाराला भरपाईचा हक्क आहे. मृत महिला विवाहीत होती केवळ या कारणामुळे भरपाई नाकारली जाऊ शकत नाही असे न्यायमूर्ती भोगले यांनी निकालपत्रात म्हटले आहे. न्यायमूर्तींनी एमएसीटीला अर्जावर सुनावणी करण्यास व सहा महिन्यांच्या आत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.
असे आहे प्रकरण : 4 नोव्हेंबर 2000 साली 19 वर्षीय स्नेहा आणि तिच्या पतीचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला.तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.यानंतर स्नेहाचे आई-वडिल सुभद्रा अणि मनोहर घुले यांनी एमसीटी मध्ये तीन लाख रुपये भरपाईचा दावा दाखल केला. परंतु एमसीटीने त्यांचा अर्ज फेटाळला होता.त्यानंतर स्नेहाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.