आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनालीसोबत 3 तास घालविण्यासाठी त्याने पोलिसांना दिले 1 लाख रुपये, त्यानंतर हॉटेलात केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गॅंगस्टर हनुमान पाटीलच्या प्रकरणात तपासात पोलिसांनी केलेला निष्काळजीपणा समोर आला आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 10 पोलिसांनी पाटील याला पत्नीसोबत हॉटेलात राहण्यासाठी परवानगी दिली होती. त्याबदल्यात त्यांनी पाटीलकडून एक लाखाची लाच स्वीकारली होती.
 
पाटीलने पोलिसांच्या या प्रवृत्तीचा फायदा घेत हॉटेलच्या खिडकीतून पलायन केले. जेजे मार्ग पोलिसांनी तळोजा जेलमधून आरोपी हनुमानची कस्टडी घेतली होती. पोलिसांनी आता तपास सुरु केला आहे की पाटीलने पळून जाण्याचा प्लॅन कसा बनवला आणि त्यासाठी त्याला कोणी मदत केली.
 
पाटील याने 2013 मध्ये प्रॉपर्टी विवादातून सिडकोच्या एका कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याचा खून केला होता. अटक करुन त्याला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. 11 फेब्रुवारी रोजी मेडिकल टेस्टसाठी त्याला जेजे रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथेच त्याने औषधे आणण्याच्या नावाखाली पळून जाण्याचा प्लॅन केला होता. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांचे पथक जेजे मार्ग पोलिस ठाण्यात पोहचले आणि फिर्याद दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा विस्तृत तपास सुरू केला. तेव्हा समोर आले की पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करण्यात आली. पाटील याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती.

एक दिवस पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी दीड वाजता जेजे रुग्णालयात आणण्यात आले होते. तिथेच त्याची पत्नी त्याला भेटण्यासाठी आली होती. त्यानंतर पाटील याने पोलिस निरीक्षक अरविंद हदाल यांना जवळच्याच दुकानातुन औषध आणण्याची परवानगी मागितली. हदाल यांनी त्याच्यासोबत 2 कॉन्स्टेबल पाठवले. दोन्ही कॉन्स्टेबल पाटील आणि त्याची पत्नी मोनिका यांना घेऊन ब्राइटवे हॉटलमध्ये गेले. तिथे त्यांनी 3 तासासाठी रूम बुक केले.
 
हनुमानची पत्नी मोनालीने त्यासाठी पैसे दिले. सुमारे 3 तासासाठी मोनाली आणि हनूमान खोलीत गेले होते. कॉन्स्टेबल खोलीच्या बाहेरच उभे होते. दोन तासानंतर कॉन्स्टेबल दरवाजा ठोठावत होते. त्यावेळी मोनालीने दरवाजा उघडला. पण पाटील मात्र खिडकीतून गायब झाला होता. त्यानंतर दोन्ही कॉन्स्टेबल जेजे रुग्णालयात आले आणि त्यांनी घडलेली घटना सांगितली. आता पोलिस तपासात मोनालीने या दोन्ही शिपायांना एक लाखाची लाच दिली असल्याचे समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...