आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Headmasters Posts Of Marathwada Will Fill Vinod Tawade

मराठवाड्यातील मुख्याध्यापकांची पदे लवकरच भरणार - विनोद तावडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठवाड्यातील शासकीय -माध्यमिक शाळांमध्ये २९९ मुख्याध्यापकांपैकी २० पदे भरलेली असून २७९ पदे लवकरच भरली जातील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी मंगळवारी एका लक्षवेधीवर दिली. या संदर्भातील लक्षवेधी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी उपस्थित केली हाेती. या पदांच्या भरतीला मॅटने स्थगिती दिल्यानंतर शासनाने अापल्या स्तरावर सर्व रिक्तपदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून शिक्षणमंत्री तावडे म्हणाले ३५६ पदांपैकी सर्वाधिक मराठवाडा विभागामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची रिक्तपदे अाहेत. उपशिक्षणाधिकारी तत्समपदे गट ब या पदाचे सेवा प्रवेश नियम २९ जून २०१३ राेजी नव्याने अधिसूचित करण्यात अाले हाेेते. परंतु या अधिसूचनेविरुद्ध विविध न्यायालयात याचिका दाखल करण्यात अाल्या. यावर महाराष्ट्र प्राशासकीय न्यायाधिकरणाने १७ नाेव्हेंबर २०१५ राेजी दिलेल्या निकालानुसार २९ जून २०१३ च्या सेवा प्रवेश नियमानुसार उपशिक्षणािधकारी पदासाठी महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाकडून घेण्यात अालेल्या १११ पदांच्या चाळणी परिक्षा व उपशिक्षणािधकारी पदाचे २९ जून २०१३ चे सेवा प्रवेश रद्दबातल ठरविण्यात अाले. त्यामुळे उपशिक्षण संवर्गातील पर्ययाने मुख्यध्यापक वर्ग दाेन ची पदे माेठ्या प्रमाणावर रिक्त असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले. मख्याध्यापक अािण ज्येष्ठ शिक्षकांची पदे त्यावर सुध्दा शासन लवकरच निर्णय घेईल असे अाश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापणार
ओ.एन.जी.सी.कडून राज्याला एक रुग्णालय आणि एक वैद्यकीय महाविद्यालय मिळणार असून प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. त्याला तावडे उत्तर देत होते. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या जागा भरण्यात येतात. त्यानुसार राज्यातील वैद्यकीयची ४३३ पदे वाढवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०० वैद्यकीय पदे वाचवायचे काम राज्य सरकारने केले आहे. सध्या १५ टक्के मेडिकलची पदे रिक्त आहेत. याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
राज्यात खाजगी आणि सरकारच्या भागीदारी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा शासनाचा विचार असून त्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक तरी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचे माहिती तावडे यांनी सांगितले. वडाळा येथे बीपीटीकडून आणि जे.एन.पी.टी येथे ओएनजीसीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.