आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेग्यमंत्री सावंतांना स्टाफकडून ‘रामराम’, दीड वर्षात सोडून गेले 12 अधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांच्यासोबत काम करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानवत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दीड वर्षात सावंत यांच्या कार्यालयात काम करणारे तब्बल १२ अधिकारी व २१ कर्मचारी सोडून गेले आहेत.
राज्यातील जिल्हा रुग्णालये ते प्राथमिक आरोग्य केंद्रे असा मोठा व्याप असलेल्या आरोग्य विभागाशी मंत्री कार्यालयातून समन्वय आणि नियंत्रण केले जाते. मात्र या कार्यालयात जवळपास कुणीच नसल्याने आरोग्य विभाग वाऱ्यावर सुटल्यात जमा आहे. विशेष म्हणजे आपली माणसे सोडून जात असताना सावंत यांनी साधी विचारणा करण्याचीही तसदी घेतली नाही, अशी तक्रारही सोडून गेलेल्यांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांच्याच नावाने..
मुळात या खात्याचे मंत्रीच प्रतिसाद देत नसल्याने लोकप्रतिनिधी आमच्या नावाने शिमगा करत, अशी बहुतेक कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.
फक्त मातोश्रीला बांधील : मंत्री आणि लाेकप्रतिनिधी-जनता यांच्यात संवादात आपण कमी पडत आहोत, असे काही अधिकाऱ्यांनी धाडस दाखवून सावंत यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण, ‘मी फक्त मातोश्रीला उत्तर देण्यास बांधील आहे. इतरांना नाही’, असे मंत्र्यांकडून आल्याने आम्ही पुढे काही बोलूच शकत नव्हतो, असे काहींनी सांंगितले.
सावंत कायम बिझी : यासंदर्भात सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. दोन मोबाइल, त्या मोबाइलवर मेसेज, बंगला तसेच घरच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला तरी प्रतिक्रियेसाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
बदल्यांमध्ये ५० काेटींचा भ्रष्टाचार : आरोग्य खात्याच्या बदल्यांमध्ये तब्बल ५० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराबद्दल डाॅ. सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी िवधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे विखे तसेच िवधान परिषद िवरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २९७ कोटींच्या औषध खरेदी भ्रष्टाचार प्रकरणात सावंतांना क्लीन चिट दिली होती.
खात्याची कामगिरी जेमतेम : दीड वर्षात अारोग्य खात्याची कामगिरी जेमतेम आहे. डाॅ.सावंतानी िवभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर िवश्वास ठेवला नाही. डाॅ. मनीषा महाजन यांनी सावंत यांचे खाजगी सचिव सुनील माळी यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. यामळे संभ्रम वाढत गेला.
- सोडून गेलेल्यांपैकी अनिरूद्ध जवळीकर यांचा आरोग्य खात्याचा चांगला अभ्यास असून काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दहा वर्षे ते या खात्यात होते.
- विजयसिंह मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ७ वर्षे काम केलेल्या सवडतकरांच्या कामाचा आवाका वेगवान होता.
- याशिवाय िशवाजीराव दावभट, डाॅ. परेश नवलकर, डाॅ. िवजय आंभोरे असे अनुभवी अधिकारी आरोग्य खात्याला लाभले होते.
पुढे वाचा, सावंत यांचे पीए माळींवर अाराेप करणाऱ्या डॉ. मनीषा महाजनांचा आत्महत्येचा प्रयत्न..
बातम्या आणखी आहेत...