आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hearing Not Cancelled Against Sunil Tatkare High Court

सुनील तटकरेंविरोधात दाखल खटल्याची सुनावणी चालूच राहणार - उच्च न्यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या बोगस कंपन्यांबाबतच्या तक्रारीनंतर 19 महिने उलटून गेल्यानंतरही तपास अपूर्ण असल्याबद्दल शुक्रवारी उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत खटल्याची सुनावणी रद्द करायला नकार दिला. भाजप नेते किरीट सोमय्या आणि माधव भांडारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कामावर नाराजीही व्यक्त केली.
तटकरे यांचे वकिल दरायस खंबाटा यांनी या प्रकरणासंदर्भात आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असल्याने इथेही सुनावणी घेऊ नये, असा युक्तिवाद केला होता. मात्र त्यावर सुनावणी उच्च न्यायालयात सुरू राहावी की नाही याबाबत दोन्ही बाजूंकडून बराच खल झाला.
मात्र न्यायालयाने तटकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद अमान्य करत सुनावणी हायकोर्टात सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.