आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hearing Of Salman Khan\'s Appeal In 2002 Hit and Run Case Delayed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाय कोर्ट : हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कनिष्ठ न्यायालयाच्या एखाद्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबतच्या नियमावलीनुसार कागदपत्रे सादर न केल्याने सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी सोमवारी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. तसेच नियमावलीनुसार अपिलाची संपूर्ण कागदपत्रे ११ सप्टेंबरपर्यंत पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हिट अँड रन प्रकरणात दोषी ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, या अपिलाच्या सुनावणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्याऐवजी आवश्यक नसलेली अनेक कागदपत्रे सादर करण्यात आल्याची बाब सलमानचे वकील अॅड. अमित देसाई यांनी निदर्शनास आणली. गेल्या महिन्यातदेखील आवश्यक ती कागदपत्रे न्यायालयाच्या रजिस्ट्रारने दोन्ही पक्षांना दिली नसल्याचे सलमानच्या वतीने सांगण्यात आले होते. त्या वेळीही न्यायालयाने असेच आदेश देत न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाला सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.