आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! 30 ते 44 वयोगटाला हृदयविकाराचा जास्त धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जीवनशैलीत झपाट्याने होत असलेला बदल, कामाचा ताण आणि आहाराशी केलेली तडजोड याचा परिणाम म्हणजे देशातल्या 30 ते 44 वयोगटातील तरुण कर्मचारी मनुष्यबळामध्ये हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मेरिको इंडस्ट्रीज या कंपनीने अलीकडेच बारा शहरांमधील 30 ते 100 वयोगटातील जवळपास 1.86 लाखपेक्षा जास्त व्यक्तींचे सर्वेक्षण करून प्रसिद्ध केलेल्या ‘सफोला लाइफ स्टडी 2013’ अहवालामध्ये अगदी 30 वर्षांच्या तरुणांच्या गटातही हृदयविकाराबरोबरच अन्य काही गंभीर आजारांची लक्षणे दिसून आल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. हे आजार 40 वयोगटातही दिसून आले आहेत. याचा अर्थ देशातील तरुणाईचे हृदय अधिक जलद कमकुवत होत असल्याचे म्हणावे लागेल. एशियन हार्ट हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अक्षय मेहता यांच्या म्हणण्यानुसार, बदललेली जीवनशैली, तणावपूर्ण कामाचे वातावरण आणि अपुरा आहार याचा 30 ते 44 वयोगटातील तरुण मनुष्यबळाच्या हृदयाच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे.

इंडिपेंडंट हेल्थ, वेलनेस अँँड फिटनेसच्या व्यावसायिक नीती देसाई यांनी सांगितले की, आपल्या सोयीनुसार आहारात खूप मोठय़ा प्रमाणावर बदल झाला आहे. प्रोसेस आणि प्रिझर्व्ह खाद्यपदार्थ तसेच फ्राइड खाद्यपदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. भाज्या, फळे यांच्याकडे दुर्लक्ष करून याच पदार्थांवर जास्त भर देणार्‍यांमध्ये या विकारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

असा वाढतोय हृदयविकाराचा विळखा
0 तळलेले आणि प्रक्रियात्मक खाद्यपदार्थांच्या सेवनामुळेही हे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. प्रक्रियात्मक खाद्यपदार्थ खाणार्‍या 30 ते 44 वयोगटातील व्यक्ती : 61 टक्के, तळलेले खाद्यपदार्थ खाणार्‍या 30 ते 44 वयोगटातील व्यक्ती : 63 टक्के.
0 हृदयविकाराचे प्रमाण विविध वयोगटांत असे : पुरुष (30 ते 34 वर्षे वयोगट) : 73 टक्के; 35 ते 39 वर्षे : 76 टक्के, 40 ते 44 : 85 टक्के; महिला (30 ते 40 वयोगट) : 60 टक्के.
0 प्रीझर्व्ह, प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे सेवन या शहरांमध्ये जास्त : दिल्ली : 45 टक्के, मुंबई : 44 टक्के, बंगळुरू : 43 टक्के.
0 तळलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन : दिल्ली (आठवड्यातून किमान दोन वेळा ) : 49 }; चंदिगड : आठवड्यातून किमान दोनदा : 45 टक्के, मुंबई : 42 टक्के, पुणे : 38 टक्के, कोलकाता : 40 टक्के.