आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेता प्रशांत दामलेंना हृदयविकाराचा झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठी अभिनेता प्रशांत दामले यांना शुक्रवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. दामलेंवर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

प्रशांत दामलेंना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांचे सर्व नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आले आहे. 'एका लग्नाची गोष्ट' हे प्रशांत दामलेंचे गाजलेले नाटक. या नाटकाचे पुन्हा एकदा प्रयोग सुरु केले होते.