आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकारावरील वोक्हार्टच्या औषधाचे औरंगाबादेत उत्पादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वोक्हार्ट लिमिटेडच्या 'क्लोपिडोग्रेल बिस्युलफेड' या हृदयविकाराची जोखीम कमी करणार्‍या औषधाला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) मान्यता मिळाली आहे. या औषधाची विक्री अमेरिकेतील बाजारपेठेत करण्यात येणार आहे. या गोळ्यांचे उत्पादन औरंगाबादच्या प्रकल्पात करण्यात येणार असल्याचे वोक्हार्टने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे.
वोक्हार्टच्या 300 एमजीच्या गोळ्यांनाही तात्पुरती मान्यता मिळाली आहे. या गोळ्या अमेरिकेतील बाजारपेठेत तातडीने आणण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या एफडीएकडून गेल्या तीन दिवसांत कंपनीच्या दोन संक्षिप्त नवीन औषधांना मान्यता मिळाली आहे. नवे औषध ब्रिस्टॉल - मायर्स स्क्वीब्स प्लाव्हिक्स गोळ्यांची जेनेरिक आवृत्ती आहे. आणखी काही औषधे लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वोक्हार्टचे संस्थापक अध्यक्ष हबील खोराकीवाला यांनी सांगितले.
आयएमएस हेल्थच्या विक्रीविषयक आकडेवारीनुसार 'क्लोपिडोग्रेल बिस्युलफेड' गोळ्यांची अमेरिकेतील बाजारपेठ जवळपास 6.5 अब्ज डॉलर्सची आहे.