आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heartiest Congratulations To Dear Students Of Class10 For Passing With Flying Colours Devendra Fadnavis

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ललिता बाबरचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपटू ललिता बाबर... - Divya Marathi
धावपटू ललिता बाबर...
मुंबई- चीनमधील वुहान येथे झालेल्या 21 व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस या धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या ललिता बाबरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यातील माणसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यात जन्मलेल्या ललिताने मध्य रेल्वेत सेवा करतानाच जिद्द आणि सातत्यपूर्ण तयारीने मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. वुहानमधील देदीप्यमान कामगिरीमुळे ललिता पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिंम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तसेच बीजिंग येथे होणाऱ्या विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेसाठीही तिने प्रवेश निश्चित केला आहे. भविष्यातील स्पर्धांमध्ये अधिक चांगल्या कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही अभिनंदन
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून यंदाच्या विक्रमी निकालाबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.
पुढे वाचा, मुख्यमंत्री आपल्या संदेशात काय म्हणाले....