आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heat And Run Case Issue Salman Hearing On Monday

सलमान खानच्या आव्हान याचिकेवर सोमवारी निकाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता सलमान खानने हिट अ‍ॅँड रनप्रकरणी दंडाधिकार्‍यांच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी निकाल दिला जाणार आहे. 2002 मधील या गुन्ह्याच्या फेरसुनावणीचा आदेश दंडाधिकार्‍यांनी दिला होता. त्याविरुद्ध सलमानने सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

गेल्या महिन्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायाधीश यू.बी. हेजीब यांनी निकालासाठी सोमवारचा दिवस निश्चित केला. सलमानचे वकील अशोक मुंदर्गी यांनी केलेल्या युक्तिवादात म्हटले की, दंडाधिकार्‍यांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवण्याचा निकाल देणे पुराव्याला धरून नाही, तसेच कायद्याच्या दृष्टीनेही ते चुकीचे आहे.

आपल्या वेगवान गाडीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईल आणि अन्य चार जण जखमी होतील, याची कल्पना सलमानला नव्हती. या गुन्ह्याअंतर्गत आरोपीला दहा वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष आहे.