आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रभर अतिवृष्टीची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. नवी मुंबईतही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत दुपारपासूनच अंधार दाटून आला होता. भरदुपारी काळोख झाल्याने लोकांना हेडलाईट लावून वाहने चालवावी लागत होती. दरम्यान, पाऊस म्हटले की, मुंबईकरांच्या जीवाला घोर लागून राहत आहे. आजची सायंकाळही काहीशी तशीच गेली. दरम्यान, नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर अंडर-17 फुटबॉल विश्वचषकाचा पहिला सामना झाला. हा सामना पावसामुळे होईल की नाही अशी भीती होती. मात्र, सामना पावसातच खेळला गेला.
 
14 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज-
 
मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मुंबई व काेकणात ५ ते १४ आॅक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. अतिवृष्टीमुळे खरीप उत्पादनाचे मोठे नुकसान होऊ शकते. हे लक्षात घेऊन सध्या कापणीयोग्य असलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची गरज आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असेही ते म्हणाले. या काळात वीज कोसळण्याच्या दुर्घटनादेखील घडू शकतात. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकऱ्यांनी विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे अावाहनही फुंडकर यांनी केले अाहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबईतील आजच्या मुसळधार पावसाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...