पुढील वर्षाची चिंंता मिटली...मुसळधार पावसाने मुंबईकरांंची दैना केली असताना मात्र, या पावसाने त्याच्यावर कृपाही केली आहे. मुसळधार पावसाने मुंबईतील तलावांमध्ये 8 वर्षांचा विक्रमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढच्या सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबई आणि उपनगरातील पावसाची आकडेवारी...
मुंबई शहर– 68.09 मिमी
मुंबई उपनगर (पूर्व)– 69.73 मिमी
मुंबई उपनगर (पश्चिम)– 88.65 मिमी
पालघर 315 मिमी
डहाणू 456 मिमी
तलासरी 72 मिमी
बोईसर 344 मिमी
वसई- 85 मिमी
मुंबईतील तलावांची साठवण क्षमता 14 लाख दक्षलक्ष लिटर असून ही पातळी आधीच ओलांडली आहे. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा धरणे तुडूंब भरली आहे. दरम्यान, 2015 मध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने मुंबईत आॅगस्टपर्यंत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती.