आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत 24 तासात 300 मिमी पाऊस, पाहा कशी उडाली शहराची दाणादाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रन वे वर चिखलात अडकलेले विमान.... - Divya Marathi
रन वे वर चिखलात अडकलेले विमान....
मुंबई- मुंबईत मागील 24 तासापासून 300 मिलीमीटरच्या घरात पाऊस पडला आहे. त्यातील मंगळवारी सायंकाळी तीन तासात 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. आज सकाळी पावसाची संततधार जरा कमी झाली आहे. मात्र, अधून मधून वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासात मुंबईवर वरूणराजाची फारशी कृपादृष्टी होणार नाही असे म्हटले आहे. पावसाचे ढग नाशिकसह उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातून मराठवाडा-विदर्भाकडे सरकतील असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मात्र, मागील 24 तासांतील पावसाने मुंबईचे बेहाल झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली तर रेल्वेसेवेसह विमानसेवा ठप्प झाली आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबईतील लोकांचे या पावसाने कसे केले बेहाल.....
बातम्या आणखी आहेत...