आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस परतला: मुंबापुरीची पुन्हा दैना; रस्ते तुंबले, लोकल ठप्प, चाकरमान्यांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तब्बल महिनाभर गडप झालेल्या वरुणराजाने सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईवर धो धो बरसण्यास सुरुवात केली अाहे. या मुसळधार पावसाने ठाणे, रायगड, मुंबई, पालघर या चारही जिल्ह्यांना झोडपून काढले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे. मंगळवारी जलमय रस्त्यांमुळे लाेकल, शहर वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून त्यामुळे चाकरमान्यांचे माेठे हाल झाले.
शनिवारपासून मुंबईत पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. सोमवारी हवामानात मोठा गारठा जाणवत होता. मध्यरात्रीपासून जोरदार सरींना सुरुवात झाली. साेमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाची संततधार सकाळपर्यंत कायम राहिली. मुसळधार पावसाचा फटका कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. सकाळी नऊ वाजता घरातून निघालेले कर्मचारी दुपारी दोन वाजता कार्यालयात पोहोचले.

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे रूळ पाण्याखाली गेल्याने विरार ते डहाणू लोकल ठप्प झाली हाेती. दुपारी बारा वाजता ठाणे ते कल्याण, कल्याण ते शहापूर, पनवेल ते ठाणे याच मार्गावरची लाेकल वाहतूक सुरळीत होती. दुपारी बारापर्यंत मध्य रेल्वेने तब्बल ६८ लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या. मुंबई शहर व उपनगरात सहा ठिकाणी शाॅर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात ३, पूर्व ८, तर पश्चिम उपनगरात ३० अशा ४१ ठिकाणी झाडे कोसळली असून बोरीवलीत दोन व्यक्ती अंगावर झाड कोसळून गंभीर जखमी झाले आहेत.
>२४ तासातील पाऊस
>४४५ मिमी- पालघर जिल्हा
>३३.२० मिमी- मुंबई शहर
>६४.८६ मिमी - पूर्व उपनगर
>६६.५५ मिमी- पश्चिम उपनगर

रुळावर दहा इंच पाणी
कुर्ला येथे रुळावर पाणी तुंबल्याने हार्बर लोकलची वाहतूक कोलमडली. सायन, माटुंगा येथे रुळावर दहा इंच पाणी होते. त्यामुळे दहा वाजता मध्य लोकल ठप्प झाली. बांद्रा येथील रूळ पाण्याखाली गेल्याने चर्च गेटची वाहतूक थांबली व चाकरमान्यांचा लेटमार्क पडला.

द्रुतगती मार्ग जाम
बांद्रा भागात पाणी साचल्याने वाहतूक मंद झाली होती. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक जाम झाली होती. रस्त्यावर झाड पडल्याने मालाडकडे येणारी वाहतूक मंदावली होती. एअरपोर्ट ब्रिजजवळ तसेच माटुंगा किंग्ज सर्कलजवळही पाणी साचले हाेते.'

रस्त्यांवर पाणी तुंबले
अंधेरी, बांद्रा, दहिसर, पाली हिल, कांदिवली, विक्रोळी, चेंबूर, कुर्ला, मुलुंड, घाटकोपर, धारावी, सायन, माहीम, हिंदमाता, विलेपार्ले, सांताक्रूझ आदी ३५ पेक्षा अधिक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबल्याच्या तक्रारी आपत्ती निवारण कक्षाकडे अाल्या होत्या.

केएफसी मार्केटला आग : गोवंडीत सम्राट अशोकनगर येथे नाईकराजा अन्सारी हा दोन महिन्यांचा मुलगा भिंत कोसळून मरण पावला. बांद्राच्या केएफसी मार्केटला आग लागली. अग्निशमन दलाने ही आग तीन तासांत अाटाेक्यात अाणली.

पुढील स्लाइडवर क्लिक पाहा, मुंबईतील दृश्ये...
बातम्या आणखी आहेत...