आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई ठप्प: रेल्वे-विमान सेवा विस्कळित, NCP चा सवाल, कुठे आहे शिवसेना?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादर परिसरात साचलेले पाणी.. - Divya Marathi
दादर परिसरात साचलेले पाणी..
मुंबई- मुंबई, ठाणे व रायगड परिसरात पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. सोमवारी रात्रीपासून मुंबई परिसरात चांगला पाऊस पडत आहे. पुण्यासह धरण क्षेत्र परिसर भोर, मुळशी, मावळमध्ये पावसांची रात्रीपासूनच संततधार सुरु आहे. पावसाचे आगमन झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही लवकरच सर्वदूर पाऊस पोहचेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात पावसाची अद्याप प्रतिक्षा आहे.
मुंबईसह, कल्याण, डोंबिवलीत रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत पालघर, डहाडू, विरार पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेंना सुट्टी देण्यात आली आहे. पालघरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 445 मिमी पाऊस कोसळला आहे. विरारजवळील 20 गावांचा संपर्क तुटला आहे.
पालघर रेल्वे स्थानकांदरम्यान दुग्ध विकास खात्याच्या डेरी क्रं.1 समोर छोट्या पुलावर पाण्याबरोबरच माती वाहून गेल्याने मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. त्याचे काम रेल्वेने हाती घेतले असुन वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी अजुन 2 ते 3 तास लागतील असे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. लोकल गाड्या 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
शिवसेना कुठे आहे?
मुंबई पावसाने तुंबली आहे. अशावेळी शिवसेना कुठे आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे शहराध्यक्ष सचिन आहिर यांनी विचारला आहे. मुंबईकरांचे हाल सुरु आहेत आणि शिवसेना अनधिकृत जिमच्या उद्घाटनाला संरक्षण देण्यात व्यस्त आहे अशी टीका आहिर यांनी केली आहे....
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, मुंबईतील मुसळधार पावसाची क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...