आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह उपनगरांत पावसाची संततधार; गुजरातहून येणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंंबई- परतीच्या प्रवासात वरुणराजा महाराष्ट्रावर पुन्हा मेहेरबान झाल्याने सर्वचजण सुखावले आहेत. मुंबईसह उपनगरांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. दादर, माटुंगा, वांद्रे भागात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. तर दक्षिण मुंबई तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही जोरदार पाऊस होत आहे. ठाणे आणि कल्याणमध्येही रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. या संंततधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे.

पालघर व बोईसर येथे रुळांवर पाणी साचल्याने गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणार्‍या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तसेच लोकलसेवा देखील ठप्प झाली आहे.
मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी
दुसरीकडेे, रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ठाण्याजवळ खारेगाव टोलनाक्याच्या येथे मोठ्या प्रमाणात ट्रफिक असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला अाहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, पालघर व बोईसर येथे रुळांवर साचले पाणी...
बातम्या आणखी आहेत...