आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rain In Mumbai, Traffic Increases On Mumbai Road

मुंबईत पावसाची पुन्हा हजेरी, जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- दादर परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे)
मुंबई- मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. लालबाग-परळ, दादर, माहिम, चेंबूरसह हाजी अली, शिवडी परिसरात जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. याचबरोब उपनगरातही पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या पावसामुळे मुंबई शहरातील वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे. सगळीकडे वाहतुक कोंडी झाल्याचे दिसत आहे. पावसामुळे वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. मुंबईकडे येणारी इस्टर्न फ्री वे वरील वाहतूक खूपच मंदावली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम उपनगरातही पावसामुळे वांद्रेकडून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र जुलै व ऑगस्टच्या पहिल्या व दुस-या आठवड्यात पावसाने मुंबईसह राज्यभर दमदार हजेरी लावली होती. यापावसामुळे महाराष्ट्रावरचे दुष्काळाचे सावट दूर झाले होते. याचबरोबर मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक शहरातील पाणीकपातीचे संकट दूर झाले होते. आता पावसाने पुन्हा एकदा मुंबईवर कृपा केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी वैतारणा, तानसा, भातसा आदी प्रमुख धरणांसह सर्वच धरणे फुल्ल भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पुढे पाहा, ट्रॅफिकचे छायाचित्र...