आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बंद, लोणावळा, उर्से टोलनाक्यावर वाहतूक रोखली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई- मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बंद करण्यात आला आहे. पुणे: महामार्ग पोलिसाकडून मुंबईला जाण्यासाठीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. एक्स्प्रेस वे वरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 
पुणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. या सगळ्याचा परिणाम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. नागरिकांची काळजी घेण्यासाठी आता महामार्ग पोलिसांनी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे.
 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग UPDATE:
- उर्से टोल नाक्यावरून लोणावळा आणि खोपोलीला जाणारी वाहतूक खुली. तर अत्यावश्यक काम असणाऱ्यांना मुंबईला सोडण्यास सुरुवात.        
- 10 वाजता पासून छोटी वाहने द्रुतगती आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून सोडण्यात आली. तर टप्याटप्याने अवजड वाहन सोडली जाणार.
बातम्या आणखी आहेत...