आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Turnout Trend Continues In 4th Phase News In Divya Marathi

बीड, नांदेडसह राज्यात 19 जागांवर उद्या मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचा प्रचार मंगळवारी सायंकाळी थांबला. गुरुवार, 17 एप्रिल रोजी राज्यात 19 मतदारसंघांत मतदान होईल. या टप्प्यात 358 उमेदवार रिंगणात असून, सव्वातीन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विदर्भातील 10 मतदारसंघांत 10 एप्रिलला मतदान झाले आहे. गुरुवारी प. महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात मतदान होत आहे. देशात हा पाचवा टप्पा असून, 12 राज्यांतील 121 जागांवर मतदान होईल. 11.80 कोटी मतदार आहेत.

चव्हाण, मुंडे, शिंदेंसह दिग्गज नेते रिंगणात
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), भाजप नेते गोपीनाथ मुंडे, राज्यमंत्री सुरेश धस (बीड), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (नांदेड), शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (बारामती), केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील (सांगली), डॉ. पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद), विजयसिंह मोहिते (माढा), राजू शेट्टी (हातकणंगले). याशिवाय लातूर, हिंगोली, परभणीसह पुणे, मावळ, शिऊर, अहमदनगर, शिर्डी, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांचा यात समावेश आहे.

पाचवा टप्पा
देशातील दिग्गज

माजी पंतप्रधान देवेगौडा, 3 केंद्रीय मंत्री आणि 6 माजी मुख्यमंत्र्यांखेरीज जसवंतसिंह, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, बायचुंग भुतिया, राजवर्धन राठोड, नंदन निलेकणी, शत्रुघ्न सिन्हा आदी नेत्यांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.