आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई दर्शनचे हेलिकाँप्टर कोसळले पायलटचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मुंबईचे हवाई दर्शन घडवणाऱ्या ‘जाॅय राइड’ कंपनीचे हेलिकाॅप्टर आरे कॉलनीत रविवारी कोसळले. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली, त्यात पायलट प्रफुल्ल मिश्रा याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. आरे कॉलनीतील जंगलात हेलिकाॅप्टर कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली. कोसळलेले हेलिकॉप्टर जुहू एअर बेसवरून १२ वाजता निघाले होते. जॉय राइडसाठी हेलिकॉप्टर ठाणे परिसरात होते. परतत असताना फिल्टर पाडा परिसरात हेलिकॉप्टर कोसळले.
मुंबईचे हवाई दर्शन घडवणाऱ्या ‘जाॅय राइड’ कंपनीचे हेलिकाॅप्टर आरे कॉलनीत रविवारी कोसळले. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली, त्यात पायलट प्रफुल्ल मिश्रा याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. आरे कॉलनीतील जंगलात हेलिकाॅप्टर कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली.

कोसळलेले हेलिकॉप्टर जुहू एअर बेसवरून १२ वाजता निघाले होते. जॉय राइडसाठी हेलिकॉप्टर ठाणे परिसरात गेले होते. ठाण्यावरून परतत असताना फिल्टर पाडा परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर अमन एव्हिएशन या खासगी कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातून परतत असताना क्लचमध्ये बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. पायलटने फिल्मसिटीच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्याला हेलिपॅडवर उतरता न आल्यामुळे पायलटने इमर्जन्सी लँडिग केले. या वेळी हेलिकॉप्टर कोसळून त्याला आग लागली. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांपैकी दोघेजण पायलट होते, तर दोघे जॉय राइडचे प्रवासी होते. रितेश मोदी, संजय शंकर व वृंदा हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


बातम्या आणखी आहेत...