आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट सक्ती आता राज्यभर लागू, दिवाकर रावते यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवीन वर्षापासून राज्यातील वाहतूक नियम अधिक कडक करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला असून आता संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच केली. त्याचप्रमाणे मद्यपी तसेच मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईचा फास अधिक आवळण्यात आला असून त्यांना पोलिस कारवाईबरोबरच आता तीन महिन्यांसाठी परवानाच गमवावा लागणार आहे. हेल्मेट सक्ती आता केवळ मुंबईपुरती नाही तर संपूर्ण राज्यात लागू झाली आहे.

सीटबेल्टबाबतचे नियमही राज्यभर लागू राहतील. हेल्मेट आणि सीटबेल्टचे नियम न पाळणाऱ्यांना आता आरटीओ कार्यालयात समुपदेशनासाठी किमान २ तास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती रावतेंनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबई शहरात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे कार्यान्वित झाल्याने वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवणाऱ्यांचे गुन्हे आता सीसी कॅमेऱ्यांत बंदिस्त होणार आहेत.त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारणे आता वाहतूक पोलिसांना आणि परिवहन अधिकाऱ्यांना अधिक सुलभ होईल.

तळीराम वाहनचालकांची संख्या घटली
गत वर्षात मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने तळीराम वाहनचालकांची संख्या घटली आहे. २०१५ सालामध्ये १४ हजार ६०२ तळीरामांवर कारवाई झाली. गतवर्षी १६ हजार १३ जणांवर कारवाई झाली होती. तर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात २०१४ मध्ये २१ लाख ३४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. २०१५ मध्ये ही संख्या ५ लाखांनी घटून १६ लाख ११८ वाहनचालकांवर कारवाई झाली.

६० हजार आॅटोरिक्षा परवाने देणार
राज्यात ६० हजार आॅटोरिक्षा परवाने देण्याचा िनर्णय घेण्यात आला असून आॅनलाईट पद्धतीने हे परवाने देण्यात येतील. आतापर्यंत ३६ हजार अर्ज आले आहेत. महिलांसाठी परवाने देताना ५ टक्के आरक्षण देण्यात आले असून १०० महिलांनी अर्ज केले असून आतापर्यंत एकूण ४१,८०० अर्ज आले आहेत. हे अर्ज फक्त मराठीतच उपलब्ध असतील.

तर ३ महिने परवाना रद्द
१) अधिक वेगाने वाहन चालवल्यास, २) सिग्नल तोडल्यास, ३) मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केल्यास, ४) मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यास, ५) मद्यपान करून वाहन चालवल्यास, ६) वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर केल्यास.
बातम्या आणखी आहेत...