आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमाच्या हत्येप्रकरणी मुख्य संशयिताला यूपीतून अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार हेमा उपाध्याय व तिचे वकील हरीश भवानी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमार ऊर्फ साधू राजभोर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली.

यापूर्वी सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांनी आझाद राजभोर, प्रदीप राजभोर आणि विजय राजभोर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शिवकुमार या मुख्य संशयिताचे नाव समोर आले होते. चौघांचाही फायबर ग्लासचा व्यवसाय आहे. हेमा आणि चिंतन उपाध्याय त्यांच्याकडून ग्लासची खरेदी करायचे. हत्येपूर्वी शिवकुमारने हेमाला तिच्या मोबाइलवर शेवटचा फोन केला होता. मोबाइल लोकेशनवरून तो उत्तर प्रदेशात असल्याचे मुंबई पोलिसांना समजले. त्यांनी ही माहिती तेथील पोलिसांना दिली. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी शिवकुमारला अटक करून त्याच्या ताब्यातून हेमासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. रविवारी सकाळी हेमा आणि भवानी यांचे मृतदेह कांदिवली येथील एका गटारात आढळले होते.
पुढील स्लाइडमध्ये, कोण होती हेमा