आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hidden Camera Found In Changing Room Of A X ray Clinic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील डायग्नॉस्‍टीक सेंटरच्‍या चेंज रुममध्‍ये महिलांचे व्हिडीओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शॉपिंग मॉलमधल्या चेन्जिंग रुममध्ये कॅमेरे लपवून महिलांचे चित्रीकरणाचे प्रकार अनेकदा घडले आले आहेत. परंतु, आता चक्क एका डायग्नॉस्टीक सेन्टरमध्ये एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांचे चेन्जिंग रुममध्ये अश्लिल चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील पश्चिम मुलुंडमध्‍ये हा प्रकार घडला आहे. एका महिलेला संशय आल्‍यामुळे या डायग्‍नॉस्‍टीक सेंटरचा भंडाफोड झाला.

प्राप्‍त माहितीनुसार, पश्चिम मुलुंडमध्ये गावडे रोडवर हे डायग्नॉस्टीक सेंटर आहे. एक 26 वर्षीय महिला या सेंटरच्‍या चेंजिंग रुममध्‍ये गेली असता तिथे तिला एक मोबाईल आढळला. मोबाईल एका प्लास्टिकच्या पिशवीत होता. पिशवीला अनेक ठिकणी छिद्रे करण्‍यात आली हाती. मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडमध्ये सुरु होता. तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्‍यानंतर या फोनवरुन सेंटरमध्‍ये जोरदार खडाजंगी उडाली.

कोण करत होता चित्रिकरण? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..