आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: पठाणकोट दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर मुंबईमध्‍ये हायअलर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पठाणकोटमधील दहशतवादी हल्‍ल्‍्यानंतर देशातील महत्‍त्‍वाच्‍या शहरांना अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईमधील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्‍त मोठ्या प्रमाणात वाढवण्‍यात आला आहे. मुंबईतील जास्‍त वर्दळीच्‍या ठिकाणी पोलिसांची गस्‍त वाढवण्‍यात आली आहे.
मुंबईमध्‍ये गेटवेचा परिसर, वेस्टर्न एक्प्रसेस हायवे, मरीन ड्राईव्ह यासारख्‍या महत्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचे अधिक लक्ष असणार आहे. पठाणकोट येथील चकमक अद्यापही थांबलेली नाही. पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशीही ऑपरेशन संपलेले नाही.
शनिवारी पाहाटे 3 वाजता जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हापासून आतापर्यंत फायरिंग आणि बॉम्बस्फोट सुरु आहे. भारताचे 7 कमांडो आणि जवान शहीद झाले आहे. चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. आणखी दडून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा एअरबेसमध्ये शोध सुरु आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, नाशकात ट्रक-दुचाकीत अपघात, आई-मुलगा ठार...