आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Alert In Mumbai For Terrorist Attack Before Jan 28

मुंबईत हाय अलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता, \'सिद्धीविनायक\' हिटलिस्टवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईवर पुन्हा एकदा 26/11 सारखा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 28 जानेवारीपूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचीही माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर मंगळवारी भाविकांची गर्दी होत असते. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असल्यामुळे दहशतवादी सिद्धीविनायक मंदिरात हल्ला घडवून आणू शकतात. 'जमात-ऊल-दावा', 'लष्कर-ए तैयबा', 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'हिजबुल मुजाहिद्दीन' या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या असून चौघांपैकी एक महाराष्ट्रात, दुसरी राजस्थानात, तिसरी उत्तर प्रदेशात आणि चौथी उडिशात पाठवण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुंबईत हल्ला घडवून आणण्‍याची जबाबदारी अब्दुल्ला-अल-कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या चार दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, समुद्रमार्गे भारतात घुसू शकतात दहशतवादी...