आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील \'व्हॅलेंटाईन डे\' स्पॉट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 14 फेब्रुवारी अर्थात 'व्हॅलेंटाईन डे'चा ज्वर सगळीकडे वाढत चालला आहे. परंतु या प्रेम द‍िवसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मुंबईतील 'व्हॅलेंटाईन डे' स्पॉट दहशतवाद्याच्या हिटलिस्टमध्ये आहे. या स्पॉट्‍सवर मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे. बांद्रा व जूहू बीच भागात मोठ्या प्रमाणात 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जात असल्यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्‍यात आली आहे.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अफझल गुरुला फाशी देण्यात आली. त्यामुळे अनेक दहशतवादी संघटनांनी भारतात दहशतवादी कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. या प्रार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस कमिश्नर सत्यपाल सिंग यांनी पश्चिम मुंबईतील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची एक बैठक बोलावली होती. मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता प्रमुख भागाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.