आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Comment On Acid Attack Case Treatment

"अॅसिड पीडितांवर सरकारी रुग्णालयातच उपचार करा' - उच्च न्यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅसिड हल्ला पीडितांसाठी जे. जे. या सरकारी व केईएम या पालिकेच्या रुग्णालयातच उपचार करणे चांगले राहील, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.
याबाबत अॅसिड हल्ला पीडित आरती ठाकूर (२५) हिने राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत भरपाई मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आरती हिच्यावर २०१२ मध्ये गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर अॅसिड हल्ला झाला होता. मनोधैर्य योजनेअंतर्गत तिला तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र, आरतीला उपचारासाठी चार लाख रुपये खर्च आला. त्यामुळे तिने याचिका दाखल केली.

याप्रकरणी गेल्या सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, अॅसिड हल्ला पीडितांना तीन लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्यावर आरतीच्या वकिलांनी तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करायची असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने सरकारी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे होईल, असे निरीक्षण नोंदवले.