आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Give Bail Till 18 April To Pratyusha Lover

प्रत्युषाच्या प्रियकराला १८ एप्रिलपर्यंत उच्च न्यायालयाने दिला जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला तिचा प्रियकर राहुल राज सिंहला उच्च न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या काळात रोज पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. राहुल सध्या आजारी असून रुग्णालयात आहे. त्यामुळे त्याला अटक करू नये, असा युक्तिवाद राहुलचे वकील अबद पोंडा यांनी केला.
राहुल प्रत्युषाच्या गोरेगावस्थित घरी राहत होता आणि तो तिचा छळ करायचा. तिच्याकडून त्याने कर्जही घेतले होते आणि तिच्या खात्यातून पैसेही काढायचा, म्हणूनच त्याच्या त्रासाला कंटाळून प्रत्युषाने आत्महत्या केल्याचे या मंगळवारी सादर करण्यात अहवालात म्हटले आहे. प्रत्युषा बॅनर्जीने एक एप्रिल रोजी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चौकशी सुरू असतानच राहुलला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.