आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • High Court Give Relaxation To The Tabacco Handiler Student

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंबाखू बाळगणारा विद्यार्थ्‍याला उच्‍च न्यायालयाचा दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वर्गात तंबाखू बाळगल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाच्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक नुकसान न करता या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेला बसू द्यावे, असे निर्देश न्यायालयाने परीक्षा मंडळाला दिले आहेत.

अनिकेत जैस्वाल हा सोळावर्षीय विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील नारायणदास भगवानदास छाबडा या सैनिकी शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. वर्गात तंबाखू बाळगल्याच्या कारणावरून ऑगस्ट 2012 मध्ये त्याला शाळेच्या शिस्तपालन समितीने निलंबित केले होते. विनंती करूनही कारवाई मागे घेतली जात नसल्याने अखेर अनिकेतने नवी मुंबईतील एका शाळेत प्रवेश घेण्याचे ठरवले. त्यासाठी सैनिकी शाळेकडे दाखल्याची मागणी केली असता, 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच ‘आपण स्वेच्छेने शाळा सोडत आहोत,’ असे लिहून देण्यास सांगण्यात आले.

शाळेकडून होत असलेल्या अडवणुकीविरोधात अनिकेतच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एस. एफ. वजिफदार व न्या. मृदुला भटकर यांच्या खंडपीठाने शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून परीक्षेच्या ऐन तोंडावरही अनिकेतचा फॉर्म लेट फीसह दाखल करून घेण्याचे व त्याला परीक्षा देण्याची संधी देण्याचे निर्देश दहावी बोर्डाला दिले आहेत.