आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Gives Relief To Amitabh Bhachchan Over Question On Kuran

अमिताभ बच्‍चन यांना हायकोर्टाचा दिलासा, \'केबीसी\'तील प्रश्‍नाप्रकरणी याचिका फेटाळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवुडचे सुपरस्‍टार अमिताभ बच्‍चन यांना ''कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात कुराण'संदर्भात विचारलेल्‍या प्रश्‍नाप्रकरणी न्‍यायालयाने दिलासा दिला आहे. बच्‍चन यांच्‍याविरोधातील याचिका अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने रद्दबातल ठरविली.

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात एक वर्षापूर्वी 'कुराण'संदर्भात एक प्रश्‍न विचारण्‍यात आला होता. त्‍यात 'रचा गया' असा उल्‍लेख होता. केलेल्या वक्तव्याप्रकरणी, अमिताभ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

'केबीसी'च्या एका प्रश्नामध्ये 'कुराण'संदर्भात 'रचा गया' हा शब्द अमिताभ यांनी वापरल्याने झाशीचे रहिवासी असलेल्या मुदस्सिर उल्लाह खान यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. २८ सप्टेंबर, २०११ ला या दिवशी हा कार्यक्रम प्रसारित झाला होता.

कुराण कोणी लिहिले नाही किंवा तयार केले नाही, अल्लाहने स्वत: ते अस्तित्त्वात आणले. त्यामुळे कुराणबाबत 'रचा गया' हा शब्द वापरणे म्हणेज गंभीर अपराध असल्यासारखे आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीने असा शब्द वापरल्याने त्याचा सर्व समाजावर परिणाम होईल, असे मुदस्सिर खान यांनी म्‍हटले हाते.

न्‍यायालयाने खान यांचा दावा फेटाळताना म्‍हटले की, 'रचा गया' हा शब्‍दप्रयोग प्रत्‍यक्ष लिहीले, असा अर्थ अभिप्रेत करीत नाही. स्‍वतः अल्‍लाहने अस्तित्त्वात आणले. म्‍हणजेच, अल्‍लाहनेच रचना केली, असाही अर्थ होतो.